मुंबई : नागरिकांना मान सन्मान देऊन बोलले पाहिजे. लॉकडाऊनची धमकी मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) का देतात ? असा प्रश्न भाजप नेते नारायण राणे  (Narayan Rane) यांनी उपस्थित केलाय. एकीकडे एक लाख 54 हजार कोटी उत्पन्न कमी आले आणि दुसरीकडे बजेटमध्ये 10 हजार कोटींची तूट असल्याचे ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का ? राज्यातील अधिकारी यांना एकच काम यांना कमवून देणे. आज सर्वसामान्य बाहेर पडला तर परत घरी जिवंत येणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. माझे कुटुंब माझी जवाबदारी ही घोषणा मुख्यमंत्री बंद करतील, कारण त्यांच्या घरातच कोरोनाबाधित झाले आहेत. ते जवाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याचे राणे म्हणाले.



आज बेड उपलब्ध करुन देऊ शकले नाहीत. राज्यातच कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातच कोरोना मृत्यू सर्वात जास्त झाले आहेत. राज्य हे आर्थिक बाबतीत मागे गेलं आहे.सर्व उद्योग धंदे कोलमडले आहेत. याला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राणेंनी केलाय.


मुख्यमंत्री स्वतः मातोश्रीत रहातात. त्यांची जेवणाची सोय आहे. सर्वसामान्य लोकांचे काय ? यावर इतर मंत्री पण बोलत नाहीत.


वाझेकडे किती गाड्या आहेत ? ओबेरॉय आणि भाईंदर इथे जी बाई गाडी बरोबर आढळली ती एकच आहे. वेगवेगळे आरोप वाझेवर होत आहेत. अशा वाझे यांना मुख्यमंत्र्यांचा पाठींबा आहे. गॉडफादर असल्याशिवाय वाझे असं करणार नाहीत असे राणे म्हणाले.


100 कोटींचे काम असेल तर 20 टक्के जास्त काम दाखवायवचे. संबंधित मंत्री-अधिकारी यांना दयायचे, हे मंत्रालयात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.


बजेटमध्ये पैसे नाहीत आणि रत्नागिरी -सिंधुदुर्गसाठी 300 कोटी रुपये हे 3 वर्षासाठी दिले.कोणी मागणी पण केली नव्हती असे राणे म्हणाले.