मुंबई: कोकणात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जिल्ह्यांसाठी सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, अलिबाग या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ठाकरे यांचा असा असणार नियोजित रायगड दौरा


अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर ५ हेक्टरवरील कृषीक्षेत्राला फटका बसला आहे. याशिवाय, चक्रीवादळानंतर बहुतांश भागातील वीज आण दूरध्वनी यंत्रणा अजूनही ठप्प आहे. शहरी भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्याची कामे सुरु करण्यात आली असली तरी ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात कामे करावी लागणार आहे. यासाठी महावितरणला मनुष्यबळाची आवश्यकता आहे.


'पुन:श्च हरिओम' : आजपासून बाजारपेठा गजबजणार, पाहा कोणत्या सुविधा पुन्हा सुरु होणार?


त्यामुळे इतर जिल्ह्यातून तांत्रिक कर्मचारी रायगड जिल्ह्यात पाठविले जाणार आहेत. त्याच बरोबर रोहित्र, वीजेचे खांब आणि तारा यांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यासाठी तातडीने निधीची आवश्यकता आहे. त्याबाबतही राज्य सरकारकडून आज मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा आजचा रायगड दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.