मुंबई : राम जन्मभुमीचा वाद मिटल्यानंतर तसेच मुख्यमंत्री पदाची सुत्र हातात घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला जाणार आहे. सरकारच्या १०० दिवसपूर्ती निमित्त ते अयोध्येला भेट देणार आहेत. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदारांना त्यांच्यासोबत अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन यासंदर्भातील माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने सध्या 'चलो अयोध्या' नारा दिला आहे. मार्चच्या दुस-या आठवड्यात उद्धव ठाकरे अयोध्येला भेट देणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा झेंडा भगवा करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालणार हे निश्चित मानले जात आहे.




दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन करुन शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल दिल्याची टीका सेनेवर होत आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना अयोध्या दौरा करुन शक्तीप्रदर्शन करु शकते.