मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्टाईल स्टेटमेंटची सध्या चर्चा आहे. शिवसेनापक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा जेव्हा वावर असायचा, तेव्हा ते वेगळे दिसायचे. पण आता मुख्यमंत्री झाल्यावर, उद्धव ठाकरेंनी स्टाईल बदलली आहे. नवे मुख्यमंत्री, नवे कपडे, नवी स्टाईल अशी सध्या चर्चा रंगते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून ते शर्ट पँटमध्येच दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते भगव्या कुरत्यामध्ये दिसले होते. दुसऱ्या दिवशीही त्यांनी कुर्ता घातला होता. पत्रकारांनी त्यांना त्यांच्या कुरत्याबद्दल प्रश्नही विचारला. त्यानंतर उद्धव ठाकरे सातत्यानं शर्ट पँटमध्येच दिसत आहेत.


आपण मुख्यमंत्री असण्यापेक्षा प्रशासक आहोत, हा मेसेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यायचा असेल. नेतेगिरीची झूल बाजूला ठेवून कॉमन मॅनचं प्रतिनिधित्व ते सिद्ध करत असतील. धारदार आणि आक्रमक प्रतिमा थोडी सोबर करण्याचाही प्रयत्न त्यांचा असू शकतो. तर तरुणांशीही रिलेट करण्याचा उद्धव यांचा प्रयत्न असेल.


प्रत्येक मुख्यमंत्र्यांची स्वतःची अशी वेगळी स्टाईल होती. शरद पवार कायम पांढरी सफारी किंवा पांढऱ्या शर्ट पॅण्टमध्येच दिसायचे. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदेंची सफारी पेटंट होती. अशोक चव्हाणही बऱ्याचवेळा सफारीतच दिसायचे. पृथ्वीराज चव्हाणांनी जॅकेटची स्टाईल आणली. तीच पुढे देवेंद्र फडणवीसांनाही आवडली. आतापर्यंत काही अपवाद सोडले तर मुख्यमंत्री कायम पांढरे कुरते, जॅकेट, सफारी किंवा स्टार्च आणि कडक इस्त्री केलेल्या कपड्यांतच दिसले. हे नवे मुख्यमंत्री मात्र थोडे वेगळे आहेत.