मुंबई : सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे (Fuel Rate) सर्वसामान्य बेहाल आहेत.  सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे नुकतीच मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या दरात भाडेवाढ करण्यात आली. सीएनजीच्या दरांचा थेट फटका हा सर्वसामांन्यांना सहन करावा लागतो. दरम्यान सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात (Cng-Png Rate) घट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. (cng png rate may be decresed in november 2022 1st week)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएनजी, पीएनजीच्या दरनिश्चितीसाठी एका समितीचं गठण करण्यात आलंय. किरीट पारेख समिती असं या समितीचं नाव आहे. ही समिती पुढच्या आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीनं केलेल्या शिफारसीनुसार CNG पीएनजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ग्राहकांना आनंदाची बातमी मिळू शकेल. 


पेट्रोल-डीझेलचे शहरनिहाय दर 


मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर