मुंबई : गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी मदतीची घोषणा केली.  फुंडकरांनी दिलेल्या माहितीनुसार १२ तारखेपर्यंत राज्यातल्या १ लाख ८७ हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. 


नुकसानाची प्राथमिक माहिती नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजूनही १३ तारखेच्या नुकसानाची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली नाही. झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी काही रक्कम निश्चित भरपाई म्हणून ठरवण्यात आलीय. 


फळबागांनाही मिळणार मदत


मोसंबी आणि संत्रा उत्पादकांना हेक्टरी २३ हजार ३००, केळी उत्पादकांना हेक्टरी ४० हजार, आंब्याला हेक्टरी ३६ हजार ७०० रुपये भरपाई मिळणार आहे.  विमा नसलेल्या फळबाग शेतक-यांनाही हेक्टरी १८ हजाराची मदत मिळणार आहे. 


जिरायती पिकांसाठीही मदत


जिरायती पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ८०० आणि बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपयांची भरपाई देण्यात येईल असं कृषी मंत्री फुंडकरांनी स्पष्ट केलंय.
 
मात्र एनडीआरएफच्या माध्यमातून मिळणा-या या मदतीबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यामुळे बोंडअळीप्रमाणेच गारपिटीबाबत केंद्र सरकार हात वर करणार की काय असा सवाल उपस्थित झालाय.