मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. मुंबईत देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या माहामारीमुळे देशावर आर्थिक  संकट उभं राहिलं आहे. मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल सेवा  गेल्या दोन महिन्यांपासून बंद होती. अखेर १५ जूनपासून लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रूळावर धावू लागली आहे. १५ जूनपासून पश्चिम रेल्वेतून तब्बल २ लाख ६२ हजार ६६७ प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. तर या काळात पश्चिम रेल्वेने ४७ लाख ३६ हजार रूपयांची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर गेल्या सात दिवसांपासून जवळपास २३ हजार प्रवासी मध्य रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेला १ कोटींचा फायदा झाला आहे. १५ जूनपासून लोकलसेवा सुरू झाल्यापासून 
पासून पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावत आहेत.


राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवास करण्याबरोबरच तिकिट खिडकी देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच खुली आहेत. हे सर्व नियम पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहेत.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल मधून प्रवास करताना ओळख पत्र दाखवण बंधनकारक करण्यात आलं आहे. अनेक नियमांचे पालन करत मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी  सुरू करण्यात आली आहे.