कॉलेज तरुण दादर येथे ओव्हरहेड वायरला चिकटला, मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वे मार्गावर दादर येथे ओव्हरहेड वायरला एक कॉलेज तरुण चिकटल्याने वाहतूक ठप्प पडली.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर दादर येथे ओव्हरहेड वायरला एक कॉलेज तरुण चिकटल्याने वाहतूक ठप्प पडली. या तरुणाला शॉक लागल्याने तो गाडीवरुन फेकला गेला आणि रुळावर कोसळला.
डोंबिवली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकलने डोंबिवलीतील कॉलेज तरुण प्रवास करत होता. मात्र, तो लोकलच्या छतावर चढला होता. दादर येथे त्याचा स्पर्श ओव्हरहेड वायरला झाला. त्याला तीव्र विजेचा झटका बसल्याने तो फेकला केला आणि रुळावर कोसळला.
या दुर्घटनेनंतर लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. ही लोकल दादर स्थानकात थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे १५ ते २० मिनिटे लोकल गाड्या थांबविण्यात आल्या. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक रखडली. ऐन पावसाळ्यात आधीच लोकल १० ते १५ मिनिटे लेट असताना त्यात अधिक भर पडला.