ठाणे: मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकात फटका गँगमुळे एका लोकल प्रवाशाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. १९ ऑगस्टला मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी कळव्याच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर हा प्रकार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल ट्रेन सुरू झाल्यावर ती वेग पकडून लागल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या काळ्या टी-शर्टमधल्या तरूणाने लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारला आणि त्याचा मोबाईल खेचला. 


या घटनेनंतर धावत्या लोकलमधून त्या प्रवाशानेही उडी मारल्याचं फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र यामध्ये संबंधित प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.