अमित जोशीसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई :  ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे विकासाचा कल जास्त असतो असं म्हणतात. राज्यात सध्या हेच पाहायला मिळत आहे. कोल्हापूरचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात स्पर्धा आहे. ही स्पर्धा आहे ती आपल्या जिल्ह्यात विमानसेवा आधी सुरु करण्यासाठी.


विमान कुणाचं उडणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्पर्धेमुळे विमान नक्की कुणाचं पहिल्यांदा उडणार, कोल्हापूरचं की जळगावचं याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोन्ही ठिकाणांहून मुंबईकरता विमानसेवा सुरु होणार आहे. मात्र यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापैकी नक्की बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. 


नेते वापरतायत राजकीय वजन


कोल्हापूरहून मुंबईसाठी विमानसेवा सुरु व्हावी यासाठी चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. तर जळगावहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी खडसेही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी हे दोन्ही नेते विमान प्राधिकरणाकडे आपलं राजकीय वजन वापरत आहेत. 


सत्ताकेंद्र कुणाचं?


दरम्यान, सत्ताकेंद्र नेमकं कुणाचं प्रभावी यावरुनच, या दोघांपैकी कोणत्या नेत्याच्या जिल्ह्यात आधी विमानसेवा सुरु होणार हे अवंलबून असणार आहे.