घर खरेदीसाठी सवलत ३१ डिसेंबरपर्यंतच, १ जानेवारीपासून स्टॅम्प ड्युटीत वाढ
जानेवारी 2021 पासून सध्याच्या सवलतीत एक टक्के वाढ
मुंबई : जर तुम्ही नवीन घर खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे..येत्या नवीन वर्षात मुद्रांक शुल्कात म्हणजे स्टँप ड्युटीत 1 टक्के वाढ करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात मालमत्ता खरेदी विक्री व्यवसायातील उदासीनतेचं वातावण दूर करण्यासाठी स्टँप ड्युटीमध्ये सवलत देण्यात आली होती.
त्यानुसार मुंबईत 3 टक्के आणि राज्यात इतर ठिकाणी दोन टक्के सवलत देण्यात आली होती. 31 डिसेंबर 2020 पर्यंत सवलत देण्यात आली होती. जानेवारी 2021 पासून सध्याच्या सवलतीत एक टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे सध्याच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सदनिका, मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात वाढ झाली.
त्यामुळे राज्यातील मुद्रांक कार्यालयांमध्ये गर्दी वाढली होती. लोकांचा प्रतिसाद पाहूनव 31 मार्चपर्यंत ही सवलत वाढवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र असा कोणताही प्रस्ताव नसून नव्या वर्षात 1 टक्के वाढ करण्यात आली आहे.