पाहा, काँग्रेस- राष्ट्रवादीने एकमेकांकडे कोण कोणत्या जागा मागितल्या
यावेळी जागावाटपाचे सूत्र ५०-५० असे ठेवण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली.
मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यांच्यामध्ये आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जागावाटपाची चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी पुणे आणि उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली. उत्तर-मध्य मुंबईतून लढण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रिया दत्त इच्छूक आहेत. तर काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून अहमदनगरची जागा मागितली. तसेच यावेळी जागावाटपाचे सूत्र ५०-५० असे ठेवण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली.
आघाडी व्हावी यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.