काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होताच भाई जगताप यांची मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा
काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. तर महापौर मात्र एकत्र लढण्याबाबत बॅटिंग करत आहेत, असं चित्र तयार झालंय. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थिरावल्यानंतर आता महापालिकाही तिन्ही पक्ष एकत्र लढतील का, याची चर्चा होती. मात्र भाई जगतापांनी स्वबळाचा नारा देत या चर्चेला सुरूंग लावला आहे. तर एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते निर्णय घेतील, असं महापौरांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आज जेजुरी गडावर दर्शन घेतलं. चंपाषष्ठीच्या निमित्तानं भाई जगताप यांनी जेजुरी गडावर खंडेरायाची सपत्नीक पूजा केली. कालच भाई जगताप यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाली आहे.
गेल्या काही वर्षात मुंबई महापालिकेत पक्षाच्या सदस्यांची संख्या कमी झाली आहे. एक चांगली टीम काम करेल. मुंबई महापालिकेत एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.