मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही बैठकींचे सत्र सुरू झाले. कॉंग्रेस आमदारांच्या बैठकीसाठी आज कॉंग्रेसचे राष्ट्रीय स्थरावरील नेते कमलनाथ आले होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील सध्याच्या घडामोडींवर चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता कमलनाथ हे आज राज्यातील कॉंग्रेस आमदारांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा कायम असल्याचे म्हटले आहे. कमलनाथ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. 


शिवसेनेचे बंडखोर आमदार लवकरच परत येतील असे, मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले. त्यामुळे महाविकास आघाडीला या जी काही मदत लागेल ती कॉंग्रेसच्यावतीने करण्यात येईल. असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले.