मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ जणांचा समावेश आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने भाजपमधून आलेल्या आशिष देशमुख यांनाच निवडणुकीच्या रिंगणात अतरविले आहे. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता सिल्लोडमधून काँग्रेसने कैझर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. तर प्रभाकर पालोडकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही. नंदुरबामधून काँग्रेस उमेदवार बदला आहे. उदेशिंग पाडवी यांना उमेदवारी दिली आहे.


तर ठाण्यातील ओवळा माजिवाडा - विक्रांत चव्हाण, कोकणातील सिंधुदुर्गमधून सुशील अमृतराव राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ५१ तर दुसऱ्या यादीत ५२ आणि तिसऱ्या यादीत २० तर चौथ्या यादीत १५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दोन ठिकाणी उमेदवार बदलले आहेत.