मुंबई :  काँग्रेससारख्या (Congress) मोठ्या पक्षाला लागलेली गळती अजूनही कायमच आहे. माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा घरघर लागलीय. आझाद यांच्या राजीनाम्याची चर्चा संपते न संपते त्यात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. (congress is leaderless political party says former maharashtra cm prithviraj chavan in zee 24 taas special interview)


काँग्रेसवर खळबळजनक आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेतृत्वहीन पक्ष झालाय. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. चव्हाण यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली.


भाजपला रोखण्यासाठीची निती कॉंग्रेसच्या मुळावर उठली?


"महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वात छोटा पक्ष होतो आणि महाराष्ट्राने तीन पक्षांचे सरकार यापूर्वी कधी पाहिले नव्हते.त्यामुळे दोन पक्षाचे सरकार चालवता अनेक अडचणी येत होत्या आणि त्या मी अनुभवल्या आहेत. तीन पक्षाचे सरकार कसे चालवायचे याबाबत शंका होती. पण आम्ही किमान समान कार्यक्रम केला आणि प्रयोग केला.अडीच वर्षे चांगल्या प्रकारे सरकार चाललं," असेही चव्हाण म्हणाले.