मुंबई : पक्षांतर्गत कारवाईनंतर काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता आता आणखी वाढली आहे. शिवसेनेकडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात उमेदवार चाचपणीची चर्चा आहे. शिवसेना नेते आणि प्रिया दत्त यांनी थेट कॅमेरावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.


'काँग्रेस रक्तात आहे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस सोडणार नाही, काँग्रेस रक्तात आहे. राजकीय विरोधकांकडून माझ्याबाबतीत अपप्रचार होतोय असं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. गेली 8 वर्षं मी AICC त सचिव पदावर होते. काही व्यक्तिगत कारणांमुळे पदमुक्त करण्याची विनंती यापूर्वीच पक्षश्रेष्ठीना केली होती. आगामी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. असंही दत्त यांनी स्पष्ट केलं आहे.


'बाळासाहेबांचे आमच्यावर उपकार'


मला उमेदवारी द्यावी अथवा नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. ते माझ्या हातात नाही. ठाकरे कुटुंबियांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. बाळासाहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. असं ही त्या म्हणाल्या.