काँग्रेस - राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, भाजप विरोधात रणनीती
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. भविष्यात आघाडी करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. भविष्यात आघाडी करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे.
लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेची निवडणूक, सरकारविरोधात संयुक्त आंदोलन करण्याबाबत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याबाबतही प्राथमिक चर्चा होणार आहे.
या बैठकीला काँग्रेस - राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. बैठकीत काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदी सहभागी होणार आहेत.