मुंबई : केंद्र सरकारनं अमिताभ बच्चन यांना GSTसाठी ब्रँड अँबेसिडर बनवल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली आहे. GSTविरोधात निदर्शनं सुरू झाल्यास त्याची धग बच्चन यांनाही सोसावी लागेल. त्यांनी भाजपा सरकारच्या मूर्खपणामध्ये सहभागी होऊ नये, असं निरुपम म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय निरुपम यांच्या या वक्तव्याचा भाजपनं समाचार घेतला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निरुपम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. बहुदा निरुपम बरेच दिवस बातम्यांमध्ये झळकले नसतील, त्यामुळेच त्यांनी बच्चन यांना विरोध केला असेल, असं मुनगंटीवार म्हणालेत. 


पाहा अमिताभ यांची GSTची जाहिरात