दीपक भातुसे, मुंबई : काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने आतापासून रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका स्वतंत्र लढवण्याबाबत याआधीच मुंबई काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. यासाठी मुंबई काँग्रेसच्या रणनिती समितीने भन्नाट प्लॅन तयार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई काँग्रेसकडून महापौरपदासाठी अभिनेत्यांची नावं जाहीर झाली तर निवडणुकीत फायदा होईल असा रणनिती समितीचा अंदाज आहे. त्या दृष्टीने महापौरपदासाठी काँग्रेसकडून सोनू सूद, मिलींद सोमण अथवा इतर प्रसिद्ध अभिनेत्यांची नाव जाहीर करण्याबाबत रणनिती समितीच्या प्रस्तावात शिफारस करण्यात आली आहे.
 
मात्र हा प्रस्तावावर अद्याप चर्चा झाली नसून मुंबई काँग्रेस या प्रस्तावावर चर्चा करण्याची शक्यता आहे. गणेश यादव या रणनिती समितीचे समन्वयक म्हणून आहेत.


मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस स्वबळावर लढते का? मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत कोणत्या अभिनेत्याचं नाव काँग्रेस पुढे करते हे देखील पाहणे उत्सूकतेचं ठरणार आहे.