भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचे महाआघाडी करण्याचे संकेत
राज्यात भाजप रोखण्यासाठी महाआघाडी करण्याचा निर्धार करण्यात आलाय.
मुंबई : राज्यात भाजप रोखण्यासाठी महाआघाडी करण्याचा निर्धार करण्यात आलाय. याबाबतची माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात आलेय. याबाबतचा प्रस्ताव काँग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना सादर करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजप सरकार विरोधात महाराष्ट्र काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. यासाठी आज बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय महाआघाडी करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसा प्रस्तावही तयार करण्यात आलाय.
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. पुढील वर्षी लोकसभा तर २०२४ ला विधानसभा निवडणुका होत आहे. भाजपने आतापासून तयारी सुरु केलेय. भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकवटणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने आजच्या बैठकीत महाआघाडी तयार करण्याचे संकेत मिळालेत. मात्र काँग्रेसने भाजपाला रोखण्यासाठी महाआघाडीचा चक्रव्यूह रचण्यासाठी रणनीती आखली आहे. कर्नाटकमध्ये झालेली विधानसभा निवडणूक आणि पालघरची पोटनिवडणूक यानंतरच्या समीकरणानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपाविरोधात महाआघाडी करण्याचा निर्धार काँग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी आज बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय महाआघाडी करण्यावर शिक्कामोर्तब झाले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधी पडेलेल्या मते आणि कर्नाटकचे समीकरणं याचा विचार करता महाराष्ट्रात येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसने पहिले पाऊल टाकले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार माणिकराव जगताप, प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील उपस्थित होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, बहुजन विकास आघाडी, सीपीएम, रिपाई (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचं अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले.