मुंबई : 'तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही,' म्हणून बोलत आहेत. असा टोला काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना लगावला आहे. तर 'गडकरी आमचे मित्र आहेत. पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेटमध्ये बॉल दिसत असतो, पण भाजपला बॉल दिसला नाही.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री-माजी मुख्यमंत्री (फडणवीस) राज्यपालांना खूप उशीर भेटले, आम्ही आधीच राज्यपालांना भेटलो, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळावी म्हणून आधी विनंती केली. लवकरच सत्ता स्थापन होईल, तुम्हांला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. मुख्यमंत्री पद, उपमुख्यमंत्री याबाबत दिल्ली स्तरावर निर्णय होतील असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे. 


नितीन गडकरी काय म्हणाले?


राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य नितीन गडकरींनी यांनी केलं होतं. तर राज्यात बिगर भाजप सरकार आलं तरी प्रकल्प सुरू राहतील याची ग्वाही त्यांनी दिली होती.


मुख्यमंत्र्यांना विश्वास


राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला होता. राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही असं सांगत निवडून आलेल्या भाजप आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी मुंबईत आयोजित भाजप, सहयोगी पक्ष आणि भाजपसोबत आलेल्या अपक्ष आमदारांच्या बैठकीत केला.


आशिष शेलार काय म्हणाले?


'राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाट्यावर भाजप लक्ष ठेवून असल्याचं आशिष शेलार यांनी म्हंटलं होतं. तसंच अतिवृष्टीग्रस्त भागात भेट देऊन भाजप नेते शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती.