मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये आता थोडी शिथिलता आणली जात आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेली विमानसेवा उद्यापासून सुरू होत आहे. मुंबई विमानतळावरूनही ही विमानसेवा सुरू होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्यापासून मुंबईच्या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मुंबई विमानतळावरून २५ विमानांच्या टेकऑफला आणि २५ विमानांच्या लॅण्डिंगला परवानगी दिली आहे. हळूहळू ही संख्या वाढवली जाईल, अशी माहिती मंत्री नबाव मलिक यांनी दिली आहे. 




विमानाने प्रवास करणाऱ्या १४ वर्षांच्या वरच्या प्रवाशांसाठी आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याचसोबत तब्येतीच्या समस्या असणाऱ्या ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आणि गरोदर स्त्रियांच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. 


विमानसेवेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्याशी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय प्रवासात अडकलेले प्रवासी, वैद्यकीय आणीबाणी, विद्यार्थी आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठीच विमानसेवा सुरू करावी, असं मुख्यमंत्र्यांनी हरदीप पुरी यांच्याशी बोलताना सांगितलं. 




पुढच्या तीन महिन्यांसाठी हे असणार विमान प्रवासाचे दर