Omicron | सावधान महाराष्ट्राचं टेन्शनं वाढलं, राज्यात ओमायक्रॉनचे 28 संशयित रूग्ण
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Varient) सापडल्यारपासून जगभराची चिंता पुन्हा वाढली आहे.
मुंबई : महाराष्ट्राची चिंता वाढवारी बातमी आहे. ओमायक्रॉननं (Corona New variant Omicron) महाराष्ट्राचं (Maharashtra) टेन्शन वाढलंय. राज्यात ओमायक्रॉनचे 26 संशयित रूग्ण सापडले आहेत. यातले 9 संशयित एकट्या मुंबईतले (Mumbai) आहेत. त्यामुळे नव्या व्हेरियंटला रोखण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर (Health Syastem) असणारंय. (Corona New variant Omicron 28 suspected patients in Maharashtra big challenge to health system)
महाराष्ट्राच्या वेशीवर पोहचलेल्या ओमायक्रॉननं सर्वांची चिंता वाढलीय. त्यात आता राज्यात ओमायक्रॉनचे 28 रूग्ण संशयित रूग्ण सापडल्यानं सर्वांची डोकेदुखी आणखीनच वाढलीय. गंभीर बाब म्हणजे यातले 9 संशयित हे एकट्या मुंबईतले आहेत. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनची लागण झालीय की नाही? हे स्पष्ट होईल.
ओमायक्रॉनची लक्षणं
सामान्य आजाराप्रमाणेच ओमायक्रॉनचीही लक्षणं आहेत. खूप जास्त थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, घशात खवखवणं, कोरडा खोकला ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत.
ओमायक्रॉनला कसं रोखाल?
ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, एसीचा अतिवापर करू नका, पंखे सुरू ठेऊ नका. शक्यतो डबल मास्कचा वापर करा. आजाराची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. ओमायक्रॉन घातक नसला तरी दुस-या लाटेचा अनुभव लक्षात घेता प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे. आपली सतर्कताच या नव्या संकटाला रोखू शकेल.