मुंबई : मुंबईत डिेसेंबर महिनाअखेरपासून सुरु झालेली कोरोना (Corona) रुग्णवाढ नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही कायम होती. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येने 20 हजारांचा टप्पा पार केला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख काहीसा कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण खरच मुंबईत कोरोनाची लाट कमी होतेय का, याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी आज माहिती दिली आहे. तिसऱ्या आठवड्यात लाट कमी व्हायला सुरूवात होईल असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं होतं. आता उतरणीचा कल कायम राहणार का यासाठी दोन तीन दिवस वाट पहावे लागेल, असं काकाणी यांनी म्हटलं आहे.


15 ते 18 वयोगटासाठी कॅम्प
बूस्टर डोससाठी (Booster Dose) सेंटरची संख्या वाढवण्यात आल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तसंच 15 ते 18 वयोगटासाठी शाळा, कॉलेजात कॅम्प आयोजित करत आहोत. 350 लसीकरण सेंटर्स सुरू केलीयत. मुलांसाठी वेगळे काऊंटर किंवा वेगळे सत्र ठेवली गेली आहेत असं सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.


शाळा कधी सुरु होणार?
मुंबईच्या कोरोनाची स्थिती, आरोग्य व्यवस्था, लसीकरण यासंदर्भाची स्थिती आम्ही राज्य सरकारला देवू तसंच शाळा सुरू करावी की नाही, याचा अहवाल आम्ही लवकरच टास्क फोर्सला पाठवू अशी माहितीही सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईत डेल्टा व्हेरियंट कमी होवून ओमायक्रॉन वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.