मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून 11 हजारांच्या आसपास असणारा कोरोना बाधितांचा (Corona patients) आकडा आज काहीसा कमी झाला आहे. गेल्या चोवीस तासात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. राज्यात 14 हजार 910 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 10 हजार 697 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या चोवीस तासात 360 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Maharashtra Corona cases)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सध्या 1,55,474 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 56,31,767 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण  95.48% टक्के इतकं झालं आहे. सध्या राज्यात 9,63,227 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,807 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेले तीन दिवस कोरोनाचा चढता क्रम


मुंबईत मंगळवारी 693 रुग्ण, बुधवारी 788, गुरुवारी 660 तर शुक्रवारी 696 रुग्ण आढळले. आजही मुंबईत 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सावध रहाण्याची गरज आहे. मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 732 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 


पुणे शहरात कोरोनाचा आकडा नियंत्रणात


पुणे शहरात दिवसभरात 331 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 459 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.