मुंबई : Corona vaccination : कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा मुंबई ( Mumbai) शहरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांचा आकडा वाढता दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आता रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील कोरोना लसीकरण मोहिमेला वेग वाढविण्यात आली आहे. मुंबईत लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा पार करण्यात आला आहे. (Corona vaccination: More than 10 lakh vaccinations in Mumbai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींवर पोहोचली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्य़ासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी चाचण्यांना देखील यश आलं आहे. 


देशात गेल्या एका दिवसात आणखी 59 हजार 118 जणांना करोनाची लागण झाली असून हा या वर्षीचा एका दिवसात लागण होण्याचा उच्चांक आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या एका कोटी 18 लाख 46 हजार 652 वर पोहोचली आहे.


मुंबई महापालिकेच्या केंद्रांमध्ये 70 टक्के लसीकरण झाले आहे. आतापर्यंत 10 लाख 8 हजार मुंबईकरांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील लसीकरण मोहिमेला वेग आला आहे.  आतापर्यंत मुंबईत 10 लाख 8 हजार 323 जणांचं लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात 70 टक्के लसीकऱण हे मुंबई महापालिकेच्या केंद्रावर झाले आहे. यापैकी 47.36 टक्के ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती बीएमसीच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली. 


मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण 106 लसीकरण केंद्र आहेत. यात महापालिकेच्या अखत्यारीत 28, केंद्र आणि राज्याच्या अखत्यारीत 12 आणि विविध खासगी रुग्णालयांमध्ये 66 लसीकरण केंद्र तयार करण्यात आलेत. शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत तर खासगी लसीकरण केंद्रावर 250 रुपये इतके शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.