मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे  (Rajesh Tope) यांनी केले आहे. कोरोना लस उपलब्ध होईपर्यंत हात स्वच्छ साबणाने धुवा, मास्कचा वापर आणि Social distance पाळा असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, आता जेजे रूग्णालयातही (JJ Hospital) आता कोरोना लस (Corona vaccine) चाचणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत बायोटेकने बनवलेल्या स्वदेशी 'लस'ची चाचणी जेजे रूग्णालयात होणार आहे. पुढील आठवड्यात या चाचणीला सुरूवात होणार आहे. १ हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. त्याआधी सायन रूग्णालयातही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन 'कोरोना लस'ची चाचणी होणार आहे. तर केईएम आणि नायर रूग्णालयात सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या कोवीशिल्ड 'लस'ची चाचणी सुरू आहे.


तर दुसरीकडे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कोरोनावर लस निर्मिती केली आहे. याची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही लस पुढील वर्षी म्हणजेच दोन ते तीन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सिरमच्या कोरोना लसकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लस निर्मिती क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या सिरममध्ये सध्या कोरोनावरील लसची निर्मिती सुरू आहे.