मुंबई : कोरोनामुळे आर्थिक मंदी येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात असली, तरी प्रत्यक्षात लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आल्यानंतरच खरं चित्र समोर येणार आहे. कोरोनात आता जे चित्रसमोर दिसत आहे, त्यानुसार सिझनल उद्योगधंद्यांना फटका नक्कीच बसला आहे. उन्हाळ्याच्या झळांप्रमाणे, ही झळ या सिझनल उद्योगांशी संबंधित व्यक्तींना बसायला सुरूवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला फटका शेतीला बसला आहे, यात फळ पिकांना सर्वात मोठा फटका आहे. खासकरून उन्हाळ्यात येणाऱ्या फळपिकाला हा फटका मोठा आहे. यात कलिंगड, लिंबू, आंबा अशा फळांना मोठा फटका आहे. शेतीचं यापेक्षाही मोठं नुकसान आहे, जे कधीही कुणाकडूनही भरून निघणार नाही, असंच आहे.


दुसरीकडे उन्हाळ्यात आईस्क्रीम, मिनरल वॉटर, कुलर्स, फ्रीज, एसी यांची विक्री जोरात असते, तो सिझन येण्यासाठी आता आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे.


रेडीमेड कपडे बनवणाऱ्यांना देखील मोठा फटका आहे, एवढंच नाही रेडीमेड कपडे विक्रेत्यांना देखील हा मोठा फटका असणार आहे.


बांधकाम ठप्प झाल्याने सिमेंट, लोखंड आणि संबंधित क्षेत्राशी संबंधित वस्तूंचा खप मंदावला आहे, या क्षेत्राला सावरण्यासाठी उशीर लागणार आहे.


ऑटो सेक्टरला देखील मोठा फटका आहे, पण त्यातून सावरायला ऑटो सेक्टरला वेळ लागणार नाही. कारण लॉकडाऊनमुळे जी खरेदी बंद होती, ती पुन्हा लगेच सुरू होईल, आणि कोरोनाचा प्रादुर्भाव सतत असेल, तर खासगी गाडीतून प्रवासाला प्राधान्य लोक देतील असं म्हटलं जात आहे.


लग्न सिझनशी संबंधित बॅन्ड, ते मंगलकार्यालयशी संबंधित अशा गोष्टींशी संबंधित सर्वच जणांना आता पुढच्या वर्षी कोरोनाच संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


एकंदरीत ज्या गोष्टींची गरज लोकांना आहे, त्याची खरेदी लॉकडाऊनमुळे थांबली होती, ती खरेदी लॉकडाऊननंतर पुन्हा वेगाने होईल, पण ज्या गोष्टींची गरज आताच नाही, ती सिझनल होती, त्या वस्तूंची खरेदी होण्यासाठी आणखी १ वर्ष जाणार आहे.