मुंबई : corona virus म्हणजेच COVID-19 चा पहिला रूग्ण जेव्हा तुमच्या शहरात आढळून येतो. तेव्हा नेमकं काय होतं आणि काय केलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. सुरूवातीला जोपर्यंत चाचणीचा अहवाल डॉक्टरांकडून येत नाही, तोपर्यंत तो एक संशयित कोरोनाचा रूग्ण असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा एखादा संशयित कोरोनाचा रूग्ण असेल. तेव्हा त्या रूग्णाने वैद्यकीय चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वत:हून सर्वांचा संपर्क किंवा समोरासमोर संवाद टाळलेला बरा. 


कारण या आजाराची लागण झाल्यानंतर तुमची काळजी घेण्यासाठी घरातील व्यक्ती आवश्यक असते, पण त्यांना लागण होणार नाही, फैलाव टाळता कसा येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे.


आपण आलो तेव्हा आपला कुणाशी जास्त संपर्क आला, अशा सर्व व्यक्तींची नावं या व्यक्तीने सांगितल्यानंतर त्या लोकांची देखील वैद्यकीय चौकशी केली जात आहे, ज्यामुळे कोरोनाचा लागण थांबवता येईल.


अनेक वेळा अशा संशयित रूग्णांचा रिपोर्ट येईपर्यंत सुविधा नसल्यास त्यांना घरातच एकांतात राहण्याचा सल्ला दिला जात आहे.


उत्तर प्रदेशातील नोएडात ज्या रूग्णाच्या संपर्कात इतर 6 जण होते, त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे, पण तरीदेखील यानंतर या सर्व 6 जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.  


इटलीतून आपल्या 3 मुलांसह आलेल्या 6 लोकांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत, त्यांना देखील वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. कारण अजूनही त्यांच्यात कोव्हीड-19 चे लक्षण दिसून आले, तर त्यांचे पुन्हा नमूने घेऊन तपासणी केली जाणार आहे.