मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांकडून हॉस्पिटलकडून लाखो रुपयांची बिलं घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. मुंबईमध्येही नानावटी हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडल्याचा आरोप करत मनसेने हॉस्पिटलबाहेर हंगामा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह नानावटी रुग्णालयाने सात लाख रुपये दिले नाही, म्हणून सोपवण्यास नकार दिला. यानंतर मनसेचा हिसका दाखवत मृतदेह परिवारास सोपवला आणि बिलही माफ करून घेतलं,' असं मनसे नेते संदीप देशपांडे फेसबूक पोस्ट करून सांगितलं. या पोस्टसोबत संदीप देशपांडे यांनी हॉस्पिटलबाहेरचा एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. 



दुसरीकडे नानावटी हॉस्पिटलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणेच आम्ही बिलाची रक्कम लावली. नातेवाईकांना मृतदेह दिला नसल्याचे आरोप चुकीचे आणि आधारहीन आहेत. नियमावलीनुसार कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर मोठ्याप्रमाणावर कागदोपत्री नोंदी कराव्या लागतात, यामध्ये बराच वेळ जातो. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे नियम हॉस्पिटल पाळते, असं नानावटी हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं आहे.