गो कोरोना गो.... आठवलेंच्या प्रार्थनेचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रावर कोरोनाच सावट
मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनाच्या व्हायरसची दहशत पसरली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेशीबाहेर असलेल्या कोरोनाने पुण्यात प्रवेश केला आहे. पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे याबाबत आता मुंबईत देखील योग्य ती काळजी घेतली जात आहे. असं असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विदेशी नागरिकासोबतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत चायना-इंडिया साँग असं म्हणत रामदास आठवलेंनी एक प्रार्थना केली आहे. 'कोरोना गो.... गो कोरोना गो....'असे या गाण्याचे बोलत आहेत.रामदास आठवलेंसोबत विदेशी नागरिक देखील ही प्रार्थना करत आहे. (कोरोनाग्रस्त जोडप्याला पुण्यात नेणारा टॅक्सी चालक रूग्णालयात दाखल)
या व्हिडिओत भारतीय ध्वजाचं चिन्ह असलेला एक पोस्टर देखील दिसत आहे. एवढंच नव्हे तर या व्हिडिओ असलेल्या नागरिकांनी हातात मेणबत्या पेटवल्या आहेत. रामदास आठवलेंच्या या व्हिडिओवरून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. आठवलेंच्या या व्हिडिओवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.
कोरोनावर उपाय म्हणून अनेक घरगुती उपाय किंवा आयुर्वेदीक औषध चर्चेत येत आहेत. इराणमध्ये तर उपाय म्हणून मिथेलियन पिऊन 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनाचा धस्का घेऊ नये योग्य ती काळजी घ्यावी. पुण्यात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्त दोन रूग्ण सापडले आहेत. या दोघांवर नायडू रूग्णालयात आयसोलेटेड विभागात उपचार सुरू आहेत.