धोका वाढला, मुंबईतील झोपडपट्टीत आता कोरोनाचा शिरकाव
मुंबईतही आता झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे.
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण बरे होत असल्याच्या बातम्या येत असताना कोरोचा फैलाव सुरुच आहे. शहरातूल कोरोना गावाच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतही आता झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे. आंबावाडीत कोरोनाबाधित रुग्ण आढळला तर दहिसरमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचे ढग अगदी गडद होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबा, घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबईतील दहिसरमध्ये कोराना बाधीत रुग्ण आढळल्याने काही प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. ज्या विभागात हे रुग्ण आढळलेत तो विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर दहिसरमधल्या झोपडपट्टीतही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मुंबईतील झोपडपट्टीत आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दहिसर इथल्या दाटीवाटीच्या अंबावाडी झोपडपट्टीत कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर गर्दी टाळणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्स पाळणे हा मोठा पर्याय आहे. त्यासाठी संपूर्ण भरतासह मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे.
हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र झोपडपट्टीतील लोकांना याचे गांभीर्यच लक्षात आलेले नाही. इथे नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत आहे. तर प्रशासन बोर्ड लावून मोकळे झाले आहे. इथे अशीच स्थिती राहिली तर एकाचे शंभर व्हायला वेळ लागणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे झोपडपट्टीत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण दाटीवाटीने वस्ती असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याचा मोठा धोका आहे.