मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुधवारी राज्यात ११७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ११३५वर पोहचली आहे. राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ११७ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाग्रस्तांबाबत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील ११३५ रुग्णांपैकी एकट्या मुंबईत ७१४ कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. 


पुण्यात ११६ जणांना कोरोनाची लागण झाली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे ग्रामीणमध्ये ६, पिंपरी-चिंचवडमध्ये १७ रुग्ण आढळले आहेत. 


सांगलीत २६, ठाण्यात २४ जणांना कोरानाची लागण झाली आहे. ठाण्यात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. 


कल्याण-डोंबिवलीत २६, नवी मुंबई २९, वसई-विरारमध्ये १० कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा भाईंदरमध्ये ३ कोरोना रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे.


नागपूरमध्ये १९ कोरोनाबाधित असून एकाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर १६, अहमदनगर ग्रामीण ९, उस्मानाबादमध्ये ४, लातूर ८, कोल्हापूर २, औरंगाबाद १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमध्ये एक कोरोनामुळे दगावला आहे.


बुलढाणामध्ये ८, साताऱ्यामध्ये ६ रुग्ण आढळले असून प्रत्येकी एक जण दगावला आहे. 


उल्हासनगर, नाशिक, जळगाव, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशिम, अमरावतीमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आहे.