मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही आणि तिसरी लाट येणार आहे... अशा वेळी लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या... कारण लहान मुलांना व्हाईट फंगसचा जास्त धोका आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनामुक्त लहान मुलांना व्हाईट फंगसचा धोका पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर हृदय आणि मेंदूवर घातक दुष्परिणाम देखील होत असल्याचं म्हटलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ब्लॅक, व्हाईट आणि यल्लो फंगसचा संसर्ग झपाट्यानं पसरतोय.. त्यात कोरोनातून ब-या झालेल्या लहान मुलांना व्हाईट फंगसचा जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. कैंडीडायसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे व्हाईट फंगस होत असल्याचं समोर आलं आहे. 


लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये हे बॅक्टेरिया जास्त आढळतात. व्हाईट फंगस फुफ्फुसांवर हल्ला करतो. नखं, त्वचा, पोट, किडनी, मेंदू, डोळे आणि तोंडावरही परिणाम होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना याचा जास्त धोका आहे. जन्मलेल्या बाळांनाही याचा धोका आहे. लहान मुलांच्या त्वचेवर डाग पडतात. जीभ पांढरी होते.


कोरोनाच्या तिस-या लाटेचा लहान मुलांना धोका आहे. त्यामुळे लहान मुलांना कुठल्याही संसर्गापासन सुरक्षित ठेवा... त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, असा आहार द्या आणि कुठलीही वेगळी लक्षणं दिसत नाहीत ना, याकडे कायम लक्ष ठेवा.


बालकांमध्ये पांढरी आणि काळी बुरशी दोन्ही आढऴतात खास करून स्टेरॉईडचा वापर उपचार करतांना बालकांवलर केल्यावर असले प्रकार होत असल्याचं तज्ञ सांगतात. यासाठी कोरोनानंतर बालकांवर लक्ष ठेवावेच लागेल सोबत त्यांच्या स्व्छतेची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. जांघांमध्ये आणि हाताखाली सुद्धा बुरशी आढळू शकते, बालकांना बाटलीनं दूध देत असला तर त्यावरही ते आढळू शकतं असे डॉक्टर सांगत आहे.