coronavirus : कोणत्या जिल्ह्यात कोणता कोरोना झोन?
कोरोना रुग्ण संख्येनुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन असणार आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 1982वर पोहचली आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत 1298 रुग्ण आहेत. देशात तीन झोन तयार करणार येणार असल्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे तीन झोन असणार आहेत. कोरोना रुग्ण संख्येनुसार हे झोन असतील. पंधरापेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेला भाग रेड झोनमध्ये असेल. पंधरापेक्षा कमी कोरोना रुग्ण असलेला परिसार ऑरेंज झोनमध्ये तर एकही रुग्ण नसलेला भाग ग्रीन झोन असेल.
ग्रीन झोन संभाव्य जिल्हे
धुळे
नंदूरबार
सोलापूर
वर्धा
परभणी
नांदेड
भंडारा
चंद्रपूर
गडचिलोरी
ऑरेंज झोन संभाव्य जिल्हे
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सातारा
कोल्हापूर
नाशिक
अहमदनगर
अकोला
यवतमाळ
बुलढाणा
अमरावती
वाशिम
गोंदिया
जळगाव
लातूर
उस्मानाबाद
बीड
जालना
हिंगोली
रेड झोनमधील संभाव्य जिल्हे
मुंबई
ठाणे
पालघर
पुणे
नागपूर
रायगड
सांगली
औरंगाबाद
मुंबई, पुणे, ठाणे, पालघरमध्ये ९१ टक्के रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत ६१ टक्के कोरोनाबाधित आहेत. तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात ९ टक्के रुग्ण आहेत. शहरी भागात अधिक रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
मुंबईत आतापर्यंत 1298 कोरोना रुग्ण आढळले असून 92 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत त्या विभागांना पालिकेने रेड झोन घोषित केलं आहे. आतापर्यंत जी/दक्षिण (वरळी-प्रभादेवी), ई (भायखळा), डी (ग्रँट रोड), के/दक्षिण (अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम) आणि एच/पूर्व (वांद्रे पूर्व), कुर्ला (एल वॉर्ड) आणि मानखुर्द-गोवंडी-देवनार (एम/ई) या विभागांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
धुळे मनपा, नंदूरबार, सोलापूर, सांगली, परभणी, परभणी मनपा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, चंद्रपूर मनपा, गडचिरोली, लातूर, नांदेड, नांडेड मनपामध्ये एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही.