मुंबई : कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 'लॉकडाऊन'ची परिस्थिती आणली. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे रूग्ण हे ८९ पर्यंत पोहोचले आहेत. तर देशभरात हा आकडा ४१५ पर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 'जनता कर्फ्यू' लागू करत देशवासियांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते. सायंकाळी पाच वाजता कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि पोलिसांचे आभार मानण्यासाठी टाळ्या, घंटानाद आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन देखील केले होते. यावर मोदींनी नाराजी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायंकाळी पाच वाजता लोकं घराबाहेर पडले. घरातच राहून कृतज्ञता व्यक्त करा हा मोदींचा संदेश नागरिक विसरून गेले. रविवारी लोकांनी अभूतपूर्व असा बंद पाळला पण त्यानंतर नागरिक घोळक्याने रस्त्यावर उतरले. यावर पंतप्रधान मोदींनी तर नाराजी व्यक्त केलीच पण यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 



आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीत. प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलात तर असेच होणार. सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, अशी टीका केली आहे.