मुंबई: गेल्या दीड वर्षांपासून जवळपास थैमान घालणाऱ्या कोरोनातून आता कुठे मुंबईकर हळूहळू सावरत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारी आली काहींचे उद्योग-धंदे बंद पडले. अनेकांवर डोक्याला हात लावून रडायची पाळी आली. मात्र हळूहळू पुन्हा सर्व रुळावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासन दोन्हीकडून प्रयत्न सुरू आहे. अखेर या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालं. नवरात्र संपताच आणि दिवाळीआधी मुंबईकरांना खऱ्या अर्थानं Positive बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. तर दिवसभरात 367 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. दरम्यान मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 30 वर गेली आहे. मुंबईत सर्व ठिकाणी लसीकरण व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. 



मुंबईमध्ये कोरोनाचे व्हेरिएंट आणि म्युकरमायकोसिसने गेल्या काही महिन्यांमध्ये थैमान घातलं होतं. आता मात्र मुंबईत परिस्थिती बऱ्याच प्रमाणात अटोक्यात आल्याचं दिसत आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे मृत्यूदर देखील घटला आहे. तर वॅक्सीनेश मोठ्या प्रमाणात राबवण्यावर महापालिका भर देत आहे. 


 


महाराष्ट्रात शनिवारी 2149 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 1898 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.