मुंबई : कोरोना व्हायरसची दहशत गुरूवारी शेअर बाजारावर पाहायला मिळाली. लाल रंगानेच शेअर बाजार उघडला. सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (Nifty) दोघांमध्येही घसरण पाहायला मिळाली. बीएसईच्या ३० शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स १,८३२ अंकाची घसरण आज पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मार्केट २७,०३७ एवढ्या अंकावर आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ५० शेअरवर आधारित निफ्टी ५५२ अंकानी कोसळून ८,३२० अंकावर उघडलं आहे. बुधवारी सेन्सेक्स १७०० अंकांनी कोसळलं होतं. 



बुधवारी देखील शेअर मार्केटमधील गुंतवणूकधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स ३९५.१९ अंक आणि निफ्टी १५३.३0 अंकांनी वर होतं. मात्र १५ मिनिटांनीच मार्केट खाली यायला सुरूवात झाली. सेन्सेक्सने १७०९.५८ अंकानी घसरण झाली असून २८,८६९.५१ वर बंद झालं. निफ्टी आज ४३१.२०अंकांनी खाली आलं आणि ८,५३५.८५ अंकांनी बंद झालं.