मुंबई समुद्रात आणखी एक आलिशान तरंगता जलमहाल
समुद्रात आणखी एका आलिशान तरंगता जलमहाल अवतरलाय. कोस्टा निओ रिव्हिएरा या भव्य क्रूझचं मुंबई बंदरात आगमन झाले आहे.
मुंबई : समुद्रात आणखी एका आलिशान तरंगता जलमहाल अवतरलाय. कोस्टा निओ रिव्हिएरा या भव्य क्रूझचं मुंबई बंदरात आगमन झाले आहे. मुंबई ते मालदीव असा जल प्रवास ही क्रूझ करणार आहे. तब्बल ६५४ शानदार खोल्या, कॅसिनो, चित्रपट गृह, शॉपिंग सेंटर, सोना आणि स्टीम बाथ,बॉल रूम, ग्रँड बार, जिम,जॉगिंग ट्रॅक, दोन पोहण्याचे तलाव. एखाद्या आलिशान पंचतारांकित हॉटेललाही लाजवतील अशा या सगळ्या सुविधा. ही दृश्यं आहेत कोस्टा निओ रिव्हिएरा या १४ मजली क्रूझ मधली. सध्या ही क्रुझ मुंबईच्या बंदरात मुक्कामाला आलीय.
सगळ्या सोयी सुविधांनी सज्ज असं हे सेवन स्टार जहाजच आहे. मुंबई ते मालदीव अशी पंधरा दिवसातून ही क्रूझ चालणार आहे. यासाठी पर्यटकांना ७ दिवसांसाठी प्रत्येकी ५५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई आणि भारतातून लाखो पर्यटक दरवर्षी क्रूझचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. मात्र इथंच त्यांना या सगळ्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पर्यटन विभाग आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून युरोपातील अग्रणी क्रुझिंग कंपनीला पाचारण करण्यात आलंय. लवकरच विमानतळाच्या धर्तीवर मुंबई क्रूझ टर्मिनलचाही कायापालट करण्याची योजना सरकारनं आखलीय.
काही महिन्यांपूर्वी मुंबई गोवा आंग्रीया क्रूझ सेवा सुरू झालीय... त्यानंतर मुंबईच्या समुद्रात आणखी दोन तरंगत्या उपहारगृहाचंही उदघाटन करण्यात आलंय. मुंबई आणि महाराष्ट्राला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होतोय.