मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दोघांना ही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पण यासोबतच त्यांना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिन्याच्या 1 आणि 23 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संदीप देशपांडे यांचे ड्रायव्हर रोहीत वैश्य आणि मनसे शाखाप्रमुख यांना देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे.



मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अनेक दिवसांपासून गायब होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने अटकेची टांगती तलवार होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर राज्यातील मनसे नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तर अनेकांना पोलिसांनी अटक ही केली होती. 


राज ठाकरे यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांना ही पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या या दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.


अटक टाळण्यासाठी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी कोर्टात धाव घेतली. अखेर आज त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला.