Coronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर
Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे.
Coronavirus In Mumbai : चीन, जपान आणि अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus) देशातही कोरोनाने डोकेवर काढले आहे. (Coronavirus in India) महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढ 10 च्या खाली आहे.
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईतही कोरोनाव्हायरसच्या संसर्गामध्ये अचानक वाढ होत आहे. हाती आलेल्या अहवालातून असे स्पष्ट दिसून आलेय की, गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय कोरोनाची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे.
गेल्या आठवड्यात, मुंबई शहरात 37 सक्रिय प्रकरणे होती, परंतु आता ही संख्या जवळपास 50 वर पोहोचली आहे. चीन, जपान आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सारख्या देशांमध्ये कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. याचे कारण BF.7 ओमिक्रॉनचा एक नवा व्हेरिएंट आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) म्हटले आहे की, घाबरण्याची गरज नाही. पालिकेने याबाबत तयारी केली आहे. विशेष कोविड वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. औषधांचा साठा तसेच ऑक्सिजन सुविधा तयार ठेवण्यात येत आहेत. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 26 वेगवेगळ्या गोष्टींवर काम करण्यात येत आहे. यामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, औषधे, आयसीयू बेड, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफचे प्रशिक्षण आणि औषधांचा पुरेसा साठा राखणे यांचा समावेश आहे.
सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये 2,100 पेक्षा जास्त खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. जेथे कोविड-19 रुग्णांवर त्वरित उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये 1,049 व्हेंटिलेटर बेड आणि 579 ICU बेडचा समावेश आहे. तेथे 3,245 डॉक्टर, 5,784 परिचारिका आणि जवळपास 200 रुग्णवाहिका आहेत.
अमेरिका आणि जपानमध्ये पुन्हा उद्रेक
दरम्यान, अमेरिकेत एका आठवड्यात 48 हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती हाती आली आहे. (Coronavirus In US) अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार, मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात सलग तिस-या आठवड्यात वाढ झालीये. साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून देशातील जवळपास 15.2 दशलक्ष मुलांना कोविड-19चं संक्रमण झाले आहे.
जपानमध्ये एका दिवसांत विक्रमी रुग्णवाढ झाली आहे. (Coronavirus In Japan) एका दिवसात तब्बल 2 लाख 16 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 415 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन उठवल्याने कोरोना रुग्णांमध्ये वेगानं वाढ झाली आणि आजवरचा सर्वाधिक रुग्णवाढीचा आकडा समोर आला आहे. रुग्णवाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. हॉस्पिटल्स रुग्णांनी भरली असून, जीव वाचवण्यासाठी संघर्ष सुरु आहे.