मुंबई : कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या (covid 19 cases in Mumbai) झपाट्याने वाढत आहे. सध्या दररोज 2 हजारांहून अधिक नवीन रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका देखील सतर्क झाली असून बीएमसीने आता जिथे अधिक प्रकरणे येत आहेत. तिथे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या भागात BMC चाचणीची संख्या देखील वाढवणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BMC या भागात उच्च जोखीम गटांचे संपर्क ट्रेसिंग देखील वाढवणार आहे. ज्या भागात चाचणी वाढवली जात आहे त्यामध्ये शहरातील दोन आणि उपनगरातील चार क्षेत्रांचा समावेश आहे.


बीएमसी सध्या दररोज सरासरी 15 हजारांहून अधिक लोकांच्या कोरोना चाचण्या घेत आहे. कोविड टास्क फोर्सने वाढती प्रकरणे पाहता चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला होता. हे गांभीर्याने घेत BMC आता चाचणी संख्या वाढवण्यावर भर देत आहे. बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, ज्या क्लस्टर्समध्ये जास्त रुग्ण आढळून आले आहेत त्या क्लस्टरमध्ये चाचणीची संख्या वाढवली जात आहे. बीएमसी डॅश बोर्डानुसार, मुंबईचे सहा वॉर्ड आहेत जिथे दररोज आढळणाऱ्या एकूण नवीन केसेसपैकी 31 टक्के रुग्ण आढळतात.


बीएमसीने ए-वॉर्ड (कुलाबा), एच-पश्चिम (वांद्रे), एम-पश्चिम (चेंबूर), एम-पूर्व (गोवंडी), एल-वॉर्ड (कुर्ला) आणि डी-वॉर्ड (ग्रँट रोड) मध्ये आपले निरीक्षण वाढवले ​​आहे. या वॉर्डांमध्ये दररोज 100 ते 150 कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे, वांद्रे येथे दररोज अडीचशेहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत.


ठाणे जिल्ह्यात एका दिवसात कोरोनाचे 957 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर, येथील एकूण संक्रमितांची संख्या 7,18,047 झाली आहे. शनिवारी माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी ही नवीन प्रकरणे समोर आली आहेत. एका दिवसात दोन रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील मृतांची संख्या 11,898 वर पोहोचली असून मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे.