मुंबईत पाच केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात
मुंबई शहरात पाच केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई : शहरात पाच केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई पोलिसांवरचा भार निश्चितच काहीसा कमी होणार आहे. संवेदनशील भाग किंवा कंटेन्टमेंट झोनच्या ठिकाणी या तुकड्या पुढील काही दिवस तैनात असणार आहेत. दक्षिण मुंबईत महोम्मद अली रोडवर CISF च्या काही जवानांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेत.
दरम्यान, मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे .मुंबईतील विक्रोळीतल्या पार्कसाईट पोलीस स्टेशनमधल्या हेड कॉन्स्टेबचा कोरोनामुळे मृत्यू झालाय...कोरोनामुळे आतापर्यंत १२ पोलीस कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत चर आतापर्यंत राज्यात १ हजार ३८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.