COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्यात कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकारमध्ये (Mahaikas Aghadi)  असलेली शिवसेना (Shivsena) पालिकेत कोरोना खर्चाच्या (Covid19 Expenses) प्रश्नावरुन एकटी पडली. या प्रश्नावर विरोधी पक्ष भाजपने आवाज उठवला आणि त्याला कॉंग्रेस-राष्ट्रवादीने देखील साथ दिली. 


मुंबई महापालिकेत कोवीड संदर्भातील खर्चावरून सत्ताधारी शिवसेने विरोधात इतर सर्व राजकीय पक्ष उभे ठाकलेत. राज्यातील सत्तेत शिवसेनेला साथ देणा-या काँग्रेस, राष्ट्रवादीनं तर या मुद्यावरून भाजपला साथ देत सत्ताधारी शिवसेनेला सत्तेची गुर्मी चढल्याची टिका केलीय. 
 
 येत्या काळात कोविडवरील खर्चासाठी 400 कोटी रुपये आकस्मिक निधीतून वळते करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत आला होता. 
 



हा प्रस्ताव फेरविचारार्थ पाठवण्याची मागणी भाजपनं केल्यानंतर याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपानं पाठिंबा दिला. आतापर्यंत पालिकेनं कोविडवर 1470 कोटी रुपये खर्च केलेत.


आगामी पालिका निवडणुकांमध्ये देखील राज्याप्रमाणेच सुत्र राहील असे महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत. पण तुर्तास तरी पालिकेच्या प्रश्नात शिवसेनेची कोंडी करण्याची संधी भाजपसोबत कॉंग्रेस-राष्ट्रवादी देखील सोडताना दिसत नाहीत