मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवाळीच्या पार्श्वभुमीवर राज्यात फटाकेबंदीचा निर्णय घेण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. फटाके फोडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. दरम्यान हा निर्णय हिंदू धर्मविरोधी असल्याची भूमिका करणी सेनेकडून घेण्यात आली असून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे आधीच सर्वजण संकटात आहेत. त्यात फटाकेबंदी केल्यास ५ लाख जणांचा रोजगार जाईल. ही बंदी म्हणजे विना अभ्यासू, संशोधन न करता केलेली आहे. दिपावलीत फटाके का फोड़तात ? याच महत्व समजुन राज्य सरकारने घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. 


पावसाळ्यात हवेत प्रदुषण असते, जास्त आजार असतात. त्यानंतर दिवाळी सण येतो. यामध्ये फटाके फोडले जातात. या फटाक्याच्या प्रचंड आवाजाने आणि फटाक्याच्या तीव्र वासाने हवा ,आकाशात आणि जमीनीवरील सूक्ष्म जीव जंतु मेले जातात असे करणी सेनेने म्हटलंय. 



फ़टाके फोडू नका हे राजेश टोपे यांचे आवाहन अर्थहिन, हिंदू धर्माच्या विरोधात आहे. हिंदू धर्माबाबत गैरसमज निर्माण करण्यासाठी विदेशी धर्म असं करतात. यामुळे संस्कृती नष्ट होते असे करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी सांगितले. 


दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडा आणि रोगमुक्त भारत बनवा असे अवाहान सेंगर यांनी केले.