Mumbai News: नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यास अनेकांनी नियोजन सुरू केले आहे. या दरम्यान नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडणार असून उत्साहाचा परमोच्च अनुभव गाठण्यासाठी मद्य, अमली पदार्थांचा तितक्याच  प्रमाणात वापरही होण्याची शक्यता असते. अशातच मुंबईतील माटुंगा रोड (Matunga Road) स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एक महिला खुलेआम ड्रग्ज विक्री करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. पण ड्रग्ज विक्री करताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रग्ज विक्रीसाठी नवा कोड आला असून या कोडचा वापर करून चहाच्या टपरीवर सरार्स ड्रग्जची विक्री केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माटुंगा रोड स्थानकालगत असलेल्या सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या या महिलेकडून गेल्या अनेक वर्षांपासून गांजाची विक्री (Selling marijuana) होत आहे.  दोन दिवसांपूर्वी गांजा विक्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच, माहीम पोलिसांनी संबंधित महिलेच्या सामानाची पुन्हा झाडाझडती घेतली.  मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. दुसरीकडे माटुंगा स्टेशन परिसरालगतही एक महिला गांजा विक्री करत होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे गेल्या चार महिन्यांपासून तिच्या ड्रग्ज विक्रीला (Selling drugs) ब्रेक लागला आहे.   


वाचा महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार होणार हलका, कसं ते जाणून घ्या 


पण या ड्रग्ज विक्रीसाठी नशेबाजांमध्ये ‘न्याहरी’ (nyahri) हा कोडवर्ड वापरला जात आहे. हा कोडवर्ड कानात सांगितला की, रस्त्यावरच्या टपऱ्यांमध्ये विकला जाणारा गांजा सहज मिळतो. माटुंगा रोड स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली एक महिला खुलेआम ड्रग्ज विक्री करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल समोर आला आहे.  


अवघ्या 5 मिनिटांत ड्रग्जची माहिती मिळते


गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाकडे ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती घ्यायला किती वेळ लागतो, असे विचारताच कुठल्याही नवीन ठिकाणी अवघ्या 5 मिनिटांत ड्रग्जची माहिती मिळत असल्याचे त्याने सांगितले.


दरम्यान भाई, बटन है क्‍या?, म्यॉंऊ म्यॉंऊ है क्‍या असे कोड वर्ड वापरून नवखे तरुण, नशेखोर बटन अर्थात नायट्रोसनचे सेवन करीत आहेत. विविध अमली पदार्थांच्या सेवनानंतर गुन्हेगारी कृत्यांत भर पडत आहे. दारू, गांजा, व्हाईटनरसोबतच बंदी असलेल्या ड्रग्जचा व्यसनासाठी वापर केला जात आहे. यात बटन नावाने परिचित असलेल्या नशाकारक पदार्थाचे सेवन केल्याने नशेच्या भरात ठार मारण्यापर्यंत काहींची मजल गेलेली आहे. विशेषत: अनेक तरुण, गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अशा ड्रग्जच्या आहारी जात आहेत.


खासकरून ड्रग्जची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून चोरट्या मार्गाने हातोहात ते पुरविले जात आहेत. गांजा, व्हाईटनर, पेट्रोलची नशा सर्रास होते; परंतु त्यापेक्षाही अधिकतम पातळीवर नायट्रोसन या हायपोटोनिक ड्रग्जची चटक नशेखोरांना लागली. नायट्रोसनची मागणी होत असल्यामुळे त्याच्या अवैध विक्रीतही वाढ होत आहे. अशा मादक, अमली द्रव्यांच्या विक्रीवर आळा घालण्याची गरज आहे.