मुंबई : भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी मनी लॉन्डरींग केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूर डाळीपासून बचत गट असे एकंदर ४५ घोटाळे आशिष शेलार यांनी केल्याचा आरोप, प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषदेत केला. या घोटाळ्यांची गंभीर दखल घेत, आशिष शेलार यांच्यावर तातडीनं कारवाईची मागणी प्रीती मेनन यांनी केली. 


त्याचवेळी सत्ताधारी पक्ष स्वपक्षीय नेत्याला वाचवत आहेत का असा सवालही त्यांनी केला. मुंबई दौ-यावर असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी, ही पत्रकार परिषद घेतल्याचं प्रीती मेनन म्हणाल्या.


दरम्यान भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी आपचे हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. प्रीती मेनन यांनी नवे कोणतेही आरोप केलेले नाहीत. केलेल्या आरोपांचे पुरावे याआधीच दिलेले आहेत. जर यावर समाधान होते नसेल तर CBI ने आणखी कोणतीही चौकशी करावी, FBI ची पण चालेल, भांडारी म्हणालेत.