अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईत जिथं माणसांना राहण्यासाठी जागा नाही, तिथं चक्क मगर आलीय. मुंलुंड पश्चिमेतल्या एका बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात मगर आहे. मगरीमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊन खाण्यासाठी ही मगर पाण्याच्या काठावर आल्यामुळे ती निदर्शनास आली. मुलुंड पश्चिमेतल्या स्वप्ननगरीत एका बिल्डरने बांधकाम सुरु केलं आहे. या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात चक्क मगर राहत होती. नोव्हेंबरपासून या खड्ड्यात मगर नागरिकांना दिसत होती. मगरीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.


स्थानिक रहिवाशांनी याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वनविभागाकडं तक्रार केली. पण कुणीही त्याची दखल घेतली नाही.  पाण्याच्या त्या खड्ड्यात किती मगरी आहेत. याची कुणालाच माहिती नाही. शेजारी दाट लोकवस्तीचा परिसर आहे. येत्या काळात ही मगर परिसरात घुसण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळं परिसरातल्या लोकांवर जीव मुठीत धरुन जगण्याची वेळ आली आहे.