मुंबई : राज्य़ातील सर्व शेतकरी पिककर्ज मुक्त होणार आहेत पण, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे 2 लाखांच्यावर आहे, त्यांनी त्यावरील रक्कमेचा भरणा केल्यानंतर त्यांना 2 लाख रूपयांतून मुक्ती दिली जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2 लाखांच्यावरील रकमेचा भरणा केल्यानंतर शेतकऱ्यांना सरकार किंवा बँक उर्वरीत 2 लाख पिककर्जमुक्ती लेखी हमी देणार आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.


कारण यापूर्वी जी सरसकट कर्जमाफी मनमोहनसिंह सरकार असताना झाली होती, त्यातही काही बँकांनी अर्धी रक्कम भरा, उर्वरित कर्जमाफ होईल असा तगादा लावला होता. पण बहुतांश शेतकऱ्यांना अर्धे पैसे भरल्यानंतरही उर्वरीत पैसे माफ झाले नव्हते.


यावरून जर सरकार आता 2 लाखांच्यावरील उरलेली रक्कम भरा आणि उर्वरित 2 लाख माफ होतील असं म्हणत असेल, तर यासाठी सरकारकड़ून किंवा बँकेकडून लेखी हमीपत्र असेल किंवा नेमकी कशी पद्धत असेल ही अजून स्पष्ट झालेलं नाही.